चिंदर भगवंत गड किल्ल्यांची पुरातत्व विभाग अधिका-यांकडून पाहाणी…!

आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील गड किल्ले डागडुजी, जतन आणि संरक्षण या विषयावर मंगळवार दिनांक 7 ऑक्टोबर रोजी मंत्रालयाच्या सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या दालनात पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली होती. यावेळी तालुक्यातील भगवंत गड किल्ल्या संवर्धन व जतनासाठी पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांना पाहाणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते. या अनुषंगाने पुरातत्व विभागाचे अधिकारी सुमेध गायकवाड यांनी आज भाजप मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत भगवंत गड किल्ल्यांची उपस्थितांशी चर्चा करून पाहणी केली.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य दिपक सुर्वे, सोसायटी चेअरमन देवेंद्र हडकर, महेश मांजरेकर, विजय निकम, मंदार सरजोशी, सिध्दार्थ कोळगे, स्वप्निल गोसावी, मुन्ना पडवळ, सर्वेश पेडणेकर, रविंद्र गोसावी, विश्राम माळगांवकर, तुषार पवार, पंचायत समिती अधिकारी आदी उपस्थित होते. संबंधित अहवाल बनून तातडीने पाठवणार असल्याचे पुरातत्व विभागाचे अधिकारी गायकवाड यांनी सांगितले तर माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार हे लवकरच भगवंत गड किल्यावर येऊन स्वतः पाहणी करणार असल्याची माहिती भाजप मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी दिली.

error: Content is protected !!