रोटरियन शर्मिन काझी यांजकडून खारेपाटण हायस्कूलला ब्लूटूथ स्पीकर भेट

खारेपाटण (प्रतिनिधी) : रोटरी क्लब ऑफ खारेपाटण या संस्थेच्या ट्रेझरियन तथा रोट्रियन व खरेराम हायस्कूल प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिक्षिका शर्मिन काझी यांनी नुकताच आपल्या वाढदिवसानिमित्त सामाजिक जाणिवेतून खारेपाटण हायस्कूलला इलेक्ट्रॉनिक ब्ल्यूट्यूथ साउंड स्पीकर सेट भेट दिला. खारेपाटण पंचक्रोशी मध्ये रोटरी क्लबच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जात आहेत. रोटरी क्लब खारेपाटण च्या सर्व सदस्यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी कार्य नेहमीच केले जाते. रोटरी क्लब खारेपाटण च्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्व स्तरावरून कौतुक देखील होत आहे. याप्रसंगी खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे, उपाध्यक्ष भाऊ राणे, सचिव महेश कोळसुलकर, सर्व विश्वस्त तसेच प्राचार्य संजय सानप पर्यवेक्षक संतोष राऊत सर्व शिक्षक कर्मचारी व रोटरी क्लब खारेपाटणचे सर्व रोटरियन यांनी शर्मन काझी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तर रोट्रियन शर्मिन काझी यांनी ब्लूटूथ स्पीकर ही भेटवस्तू नुकतीच प्रशालेचे मुख्याध्यापक संजय सानप यांचेकडे शाळेच्या वापरासाठी सुपूर्द केली. रोटरी क्लब ऑफ खारेपाटण यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन केले जात आहे. यावेळी शाळेचे सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.

error: Content is protected !!