आंबोली घाटात एलसीबीने पकडली अवैध दारू ; 11 लाख 67 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

सावंतवाडी (प्रतिनिधी) : एलसीबी च्या पथकाने कोल्हापूर च्या दिशेने कारमधून होणारी गोवा बनावटीची अवैध दारू पकडली. 1 लाख 67 हजार 400 रुपयांची दारू आणि 10 लाख रुपये किंमतीची दारू असा एकूण 11 लाख 67 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई 12 ऑक्टोबर रोजी सकाळी 7 वाजून 15 मिनिटांनी आंबोली घाटात पूर्वीचा वस नजीक करण्यात आली. सावंतवाडी आंबोली घाटरस्त्यात गस्त घालत असताना संशयास्पद XUV कार ( MH -03 – 0003) आढळून आली. कार थांबवून तपासणी केली असता आतमध्ये गोवा बनावटीची दारू आढळून आली. या गुन्ह्यात अजित सुखदेव जगताप ( रा.मोहोळ ), पुंडलिक नामदेव बाबर ( रा. पंढरपूर ) या दोघांना ताब्यात घेऊन जप्त मुद्देमालासह सावंतवाडी पोलीसांच्या हवाली करण्यात आले. एलसीबी ने दिलेल्या फिर्यादीनुसर सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ दहिकर, अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या सुचनेनुसार एलसीबी पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश राठोड, अंमलदार अमर कांडर, महेश समजीसकर यांनी केली.

error: Content is protected !!