कणकवली शिवाजीनगर येथील घटना
कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरात शिवाजीनगर येथे इमारतीखाली उभी करून ठेवलेली टिव्हीएस कंपनीची एंटॉर्क दुचाकी चोरीस गेल्याची घटना 12 ऑक्टोबर रोजी उघडकीस आली. अधिक माहिती अशी की कोकण रेल्वे कर्मचारी अनिल तुकाराम तांबे (वय 56) हे माऊली दर्शन अपार्टमेंट शिवाजीनगर, कणकवली येथे राहतात.
शनिवार 11 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7 वाजता तांबे यांनी आपली दुचाकी इमारतीखाली पार्क केली. रविवार 12 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता गाडी पार्क केलेल्या ठिकाणी आढळून आली नाही. शोधाशोध करूनही गाडी सापडून आली नाही. त्यामुळे अनिल तांबे यांनी आपली दुचाकी टीव्हीएस एंटॉर्क क्रमांक MH07 AP7049 ही चोरीस गेल्याची कणकवली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सदर गाडी आढळून आल्यास कणकवली पोलीस ठाणे येथे दूरध्वनी क्रमांक 02367232033 अथवा अनिल तांबे मोबाईल क्रमांक 9422394554 येथे संपर्क करावा.












