कणकवली पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. यामध्ये विविध मतदारसंघांसाठी प्रवर्गनिहाय आरक्षण निश्चित करण्यात आले आहे.

तरेळे, खारेपाटण, फोंडा, हरकुळ खुर्द, वरवडे आणि कळसुली या ठिकाणी सर्वसाधारण प्रवर्ग जाहीर करण्यात आला आहे.

तर नांदगाव आणि नाटळ या ठिकाणी इतर मागासवर्गीय (ओबीसी) महिला प्रवर्ग, तसेच कासार्डे आणि कलमठ येथे ओबीसी सर्वसाधारण प्रवर्ग निश्चित करण्यात आला आहे.

जाणवली या ठिकाणी अनुसूचित जाती महिला प्रवर्ग राखीव ठेवण्यात आला असून, बिडवाडी, लोरे, हरकुळ बुद्रुक, ओसरगाव आणि नरडवे या ठिकाणी सर्वसाधारण महिला प्रवर्ग घोषित करण्यात आला आहे.

या आरक्षण सोडतीनंतर आता उमेदवार निश्चिती आणि निवडणूक प्रक्रियेबाबत राजकीय हालचालींना वेग येणार आहे.

error: Content is protected !!