दिविजा वृद्धाश्रमाने शालेय विद्यार्थ्यासाठी दिवाळी करता उटणे वाटप करून राबवला एक आगळा वेगळा उपक्रम

कणकवली (प्रतिनिधी) : आज कालच्या आधुनिक युगात तरुण पिढी आधुनिक करणा वळत चालली आहे. दिवाळी ला सुगंधी उटणे वापरणे विसरत चालली आहे. आपली पारंपरिक संस्कृती विसर पडू नये ह्या करता दिविजा वृद्धाश्रमातील आजी आजोबांनीं देवगड तालुका कणकवली तालुका व मालवण तालुकातील विविध शाळेतील विद्यार्थीसाठी मोफत उटणे वाटप करून एक आगळा वेगळा उपक्रम राबवाला. दिविजा वृद्धाश्रमातील आजी आजोबांनी आपल्या शालेय नातवंडांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी पारंपारिक उटणे स्वतः बनवून विद्यार्थ्यांना वाटले. दिविजा वृद्धाश्रमाचे संचालक संदेश शेट्ये यांनी आजी आजोबांचे हे शुभ आशीर्वाद कणकवली, देवगड व मालवण तालुक्यातील जवळ जवळ 20 हजार विद्यार्थ्यांना देण्यात आले.आज कालच्या तरुण पिढीला उटणे, कारटी, पणत्या, रांगोळ्या यां गोष्टींचा विसर पडत चालला आहे आपली संस्कृती काय आहे हे जाणून देण्यासाठी दिविजा वृद्धाश्रमातील आजी आजोबांनी विद्यार्थ्यांना मोफत उटणे वाटण्याचा कार्यक्रम केला. उटण्याच्या माध्यमातून आजी आजोबांना आपल्या शालेय नातवडांना भरभरून आशीर्वाद व प्रेम पाठवले आहे.

कणकवली, देवगड व मालवण तालुक्यातील माध्यमिक शाळा कोळोशी हडपिड, शिरगाव केंद्र शाळा नं १, प्राथमिक शाळा कोळोशी हडपिड, प्राथमिक शाळा कोळोशी वरचीवाडी, प्राथमिक शाळा असलदे गावठणवाडी, प्राथमिक शाळा असलदे मधलीवाडी, प्राथमिक शाळा हडपिड खालचीवाडी, प्राथमिक शाळा शिरगाव राकसवाडी, प्राथमिक शाळा शिरगाव निमतवाडी, प्राथमिक शाळा शिरगाव आंबेखोल, कणकवली कॉलेज कणकवली, विद्यामंदिर हायस्कुल कणकवली, एस.एम. हायस्कुल कणकवली, बाल शिवाजी इंग्लिश मिडीयम स्कुल जाणवली, कळसुली शाळा, वामनराव महाडिक विद्यालय तळेरे, कासार्डे विद्यालय, वारगाव प्राथमिक शाळा नं 1, वारगाव प्राथमिक शाळा नं 3,प्राथमिक शाळा असलदे तावडेवाडी, सरस्वती हायस्कूल नांदगाव, मठ माध्यमिक शाळा, जि.प.प्राथमिक शाळा नवीन कुर्ली वसाहत फोंडाघाट, मालवण तालुका शाळा, चौके हायस्कूल ,आयडियल इंग्लिश मिडीयम स्कूल, शिरगाव हायस्कूल, इंग्लिश मिडीयम स्कूल फोंडाघाट, आर्ट्स & कॉमर्स कॉलेज फोंडाघाट, केळकर कॉलेज देवगड अशा या शाळेतील विद्यार्थ्यांना उटणे वाटप करण्यात आले.

error: Content is protected !!