फोंडाघाटचा कबड्डी संघ जिल्हास्तरीय स्पर्धेत विजेता

रत्नागिरीत विभागस्तरीय स्पर्धेत सिंधुदुर्गचे प्रतिनिधित्व करणार

फोंडाघाट (प्रतिनिधी) : क्रीडा व युवक सेवा संचलनाय, महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद, सिंधुदुर्ग द्वारा क्रीडा संकुल सिंधुदुर्गनगरी ओरोस येथे आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज, फोंडाघाटच्या 14 वर्ष वयोगट मुलांच्या संघाने विजेतेपद पटकावले. हा विजेता संघ रत्नागिरी येथे होणाऱ्या कोल्हापूर विभागस्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.

विजेत्या संघातील खेळाडू आणि मार्गदर्शक शिक्षक ए.व्ही.पोफळे यांचे फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी, शाळा समिती चेअरमन व संचालक मंडळ, प्रशालेचे मुख्याध्यापक पी.के.पारकर, पर्यवेक्षक व्ही.पी.राठोड, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व विभागस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

error: Content is protected !!