कणकवली (प्रतिनिधी) : भाजपा तालुका उपाध्यक्ष श्री. राजेश उर्फसोनू सावंत मित्रमंडळाच्या वतीने वरवडे फणसवाडी येथे रविवार दिनांक 19 ऑक्टोबर रोजी रात्री 8 वाजता भव्य नरकासुर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या नरकासुर स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेत्या संघाला रोख रु 7 हजार 1 आणि आकर्षक चषक, द्वितीय विजेत्या संघाला रोख रु.5 हजार 1 व आकर्षक चषक, तृतीय विजेत्या संघाला रोख रु. 3 हजार 1 आणि अकर्षक चषक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येक संघाला आकर्षक चषक देण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अनिल घाडीगांवकर मोबा.8830096900, केतन घाडीगांवकर मोबा.9284878531 आणि हनुमंत बोन्द्रे मोबा. 9422562599 यांच्याशी संपर्क साधावा.
सोनू सावंत मित्रमंडळाच्या वतीने भव्य नरकासुर स्पर्धेचे आयोजन











