BIG BREAKING ! सिंधुदुर्गात शिवसेना उबाठा – मनसे एकत्र येणार

माजी आमदार वैभव नाईक -मनसे पदाधिकाऱ्यांमध्ये कणकवलीत झाली बैठक ; कणकवली विधानसभा मतदारसंघाबाबत ठरवली रणनीती

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपंचायत नगरपालिका निवडणूक शिवसेना उबाठा आणि मनसे सिंधुदुर्गात एकत्र लढणार असल्याची खात्रीशीर माहिती आहे. याअनुशंगाने कणकवली विधानसभा मतदारसंघात रणनीती ठरविण्यासाठी महत्वाची बैठक कणकवली रेस्ट हाऊस मध्ये माजी आमदार वैभव नाईक आणि मनसे चे सिंधुदुर्ग नेते गजानन राणे, संदीप दळवी यांच्यात गुप्त बैठक पार पडली. त्यानंतर मनसे नेते गजानन राणे, संदीप दळवी यांनी कणकवली विधानसभा मतदारसंघातील मनसे पदाधिकाऱ्यांना निवडणूक बाबत मार्गदर्शन केले. राज्यात ठाकरे बंधूंच्या झालेल्या दिलजमाईनंतर आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीसाठी उबाठा सेना आणि मनसे एकत्र येत असल्याचे दिसून येत आहे.

error: Content is protected !!