वाढदिवशी आरोग्यविषयक उपकरण वाटप; भाजपा युवा नेते विशाल परब यांचा सामाजिक उपक्रम

सावंतवाडी (प्रतिनिधी) : भाजपा युवा नेते विशाल परब यांनी आपला वाढदिवस सामाजिक उपक्रमातून साजरा करत आदर्श निर्माण केला आहे. तुळस गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्यसेवेसाठी आवश्यक साहित्य वाटप करून त्यांनी समाजोपयोगी उपक्रम राबविला. या प्रसंगी बी.पी. मशीन, नेब्युलायझर, स्टेथोस्कोप, ऑक्सिमीटर, वेट मशीन, फेटल डॉपलर मशीन यांसारखे आरोग्यविषयक साहित्य आरोग्य केंद्राला देण्यात आले.

कार्यक्रमाला भाजपा महिला मोर्चा तालुकाध्यक्ष सुजाता पडवळ, तुळस सरपंच रश्मी परब, भाजपा युवा मोर्चा सरचिटणीस वैभव होडावडेकर, बुथप्रमुख प्रमोद गोळम, पिंट्या राऊळ, बंटी परब, ग्रा.पं. सदस्य रुपेश कोचरेकर, जयवंत सावंत, अवधूत मराठे यांच्यासह डॉक्टर मिलिंद मोळके, डॉक्टर सानिया खान, आरोग्य सेवक साईस्वरूप देसाई, सहाय्यक दयानंद गवस, श्रीमती परब, श्रीमती वजराठकर, NCD स्टाफ, परिचर श्री. शेळके, बाबू कुंभार, प्रविण परब, अभय किनळेकर आणि अनेक भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

समाजसेवेच्या माध्यमातून वाढदिवस साजरा करण्याची ही अभिनव संकल्पना सर्वांसाठी प्रेरणादायी ठरली.

error: Content is protected !!