ओसरगाव ग्रामपंचायत कडून जि. प. शाळेला लॅपटॉप, कलर प्रिंटर भेट

कणकवली (प्रतिनिधी) : ओसरगाव ग्रामपंचायत मार्फत १५ व्या वित्त आयोगातून ओसरगाव कानसळी वाडी जिल्हा परिषद शाळेला लॅपटॉप आणि कलर प्रिंटर देण्यात आला. शाळा मुख्याध्यापक श्री. गोसावी आणि शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षांनी सरपंच सुप्रिया कदम यांच्याकडे ग्रामपंचायतमार्फत शाळेसाठी शैक्षणिक साहित्य देण्याची मागणी केली होती. त्यानुसार सरपंच सुप्रिया कदम यांनी लॅपटॉप आणि कलर प्रिंटर शाळेला दिला. सरपंच सुप्रिया कदम यांच्या हस्ते मुख्याध्यापक श्री. गोसावी यांच्याकडे लॅपटॉप आणि कलर प्रिंटर सुपूर्त करण्यात आला. यावेळी उपसरपंच गुरुदास सावंत, संतोष कदम, शिक्षक आणि ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.

error: Content is protected !!