चौके (प्रतिनिधी) : श्री शिवाजी वाचन मंदिर काळसेच्या वतीने जि. प. शाळा काळसे परबवाडा नं. १ येथे भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त “वाचन प्रेरणा दिन” साजरा करण्यात आला. यावेळी ग्रंथालय सेक्रेटरी श्री तुकाराम प्रभू यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. ग्रंथपाल चारूलता काळसेकर यांनी उपस्थिताचे स्वागत केले.
ग्रंथालयाच्या वतीने शिवनंदन प्रभू यांनी मनोगत व्यक्त केले. मुख्याध्यापक देवेंद्र चव्हाण यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीम. नेरुरकर यांनी केले. या प्रसंगी हरेश आंग्रे, पालक प्रतिनिधी सौ. प्रभु, हर्षदा आंग्रे, निलिमा काळसेकर, सौ. काळसेकर आणि विद्यार्थी उपस्थित होते. मुलांच्या मनात वाचन क्षमता विकसित होण्यासाठी वाचन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.












