नवीन कुर्ली प्राथमिक शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी अमित दळवी यांनी बिनविरोध निवड

फोंडाघाट (प्रतिनिधी) : आज नवीन कुर्ली प्राथमिक शाळा येथे शाळेच्या मुख्याध्यापिका रेणुका जोशी यांच्या उपस्थितीत शाळा व्यवस्थापन समिती पुनर्गठीत करण्यात आली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी अमित दळवी, उपाध्यक्षपदी आरती पिळणकर, सचिवपदी रेणुका जोशी, शिक्षण प्रेमी राजेंद्र कोलते तर सदस्यपदी विनायक कुबडे, शिवाजी होळकर, मंगेश तायशेट्ये, आश्विनी पेडणेकर, विनिता कोलते, पूजा राणे, पूजा जाधव, बाळकृष्ण चव्हाण, प्रमिला आग्रे, भागू पावणे, शिक्षक प्रतिनिधी मीनाक्षी वरवडेकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. मागील वर्षाच्या कारभार आणि शाळेची प्रगती पाहता सर्वानुमते पुन्हा एकदा अमित दळवी यांना अध्यक्ष करावे असे ठरले. यावेळी नवीन पदाधिकारी आणि सदस्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

या वेळी बोलताना शाळेचा सर्वांगिण विकास, प्रगती आणि शाळेचे नाव उज्वल करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही नूतन अध्यक्ष अमित दळवी यांनी दिली. या प्रसंगी नवीन कुर्ली ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र कोलते, तंटामुक्ती अध्यक्ष प्रदीप कामतेकर, कृष्णा परब, आशिष पेडणेकर, सखाराम हुंबे, शाळेच्या मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक, पालक, ग्रामस्थ आणि शिक्षण प्रेमी उपस्थित होते.

error: Content is protected !!