चौके (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धा क्रीडा संकुल सिंधुदुर्ग या ठिकाणी पार पडल्या. या स्पर्धांमध्ये भ. ता. चव्हाण महाराष्ट्र माध्यमिक विद्यालय चौके चा विद्यार्थी कु. सर्वेश मिलिंद गोसावी याने भालाफेक प्रकारामध्ये 17 वर्षाखालील मुले गटात प्रथम क्रमांक प्राप्त करून विभाग स्तरावर प्रवेश मिळविला.
तसेच चौदा वर्षाखालील मुली गटामध्ये कु.संवेदी सत्यवान गावडे या विद्यार्थिनीने थाळीफेक प्रकारामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त करून विभाग स्तरावर प्रवेश मिळविला.दोन्ही विद्यार्थ्यांना प्रशालेचे क्रीडा शिक्षक अनिल आचरेकर यांचे मार्गदर्शन लाभले.
सर्व विद्यार्थ्यांचे स्थानिक समिती अध्यक्ष बिजेंद्र गावडे, मुख्याध्यापिका रसिका गोसावी,सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस आणि विभाग स्तरासाठी शुभेच्छा दिल्या.












