श्री देवी सरस्वती वाचनालय व ग्रंथसंग्रहालय चिंदर येथे वाचन प्रेरणा दिन साजरा

आचरा (प्रतिनिधी) : भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या स्मृती सार्थ रितीने जतन करण्यासाठी 15 ऑक्टोबर हा त्यांचा जन्मदिवस ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने श्री देवी सरस्वती वाचनालय व ग्रंथसंग्रहालय चिंदर येथे भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस अध्यक्ष प्रकाश मेस्त्री यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले व शालेय विद्यार्थ्यांना पुस्तके भेट देण्यात आली.

यावेळी ग्रंथपाल स्वरा पालकर, सहसचिव सिध्देश गोलतकर, गोपाळ चिंदरकर, रावजी तावडे, विवेक परब, चिन्मयी पाताडे, आनंद चिंदरकर, अशोक कासले तसेच शालेय विद्यार्थी, वाचक वर्ग आदी उपस्थित होते. प्रास्ताविक रावजी तावडे यांनी तर आभार सिध्देश गोलतकर यांनी केले.

error: Content is protected !!