देवगड (प्रतिनिधी): वळीवंडे येथील कृषी कॉलेजसमोर जामसंडे बेलवाडी येथील प्रदीप राजाराम अदम(४२) हे मृतावस्थेत आढळले. ही घटना २१ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वा.सुमारास निदर्शनास आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार प्रदीप राजाराम अदम यांना दारूचे व्यसन होते.दारू प्राशन केलेल्या स्थितीत ते भटकत असत.ते मोलमजुरी करीत.मात्र दारूचे अति व्यसन असल्याने आणि उपाशीपोटी भटकत असल्याने अशक्तपणामुळे ते वळीवंडे कृषी कॉलेजसमोर मृतावस्थेत आढळले. याबाबतची खबर त्यांचा भाऊ विनोद राजाराम अदम यांनी देवगड पोलिसांना दिली. पोलिसांनी आकस्मिक मृत्युची नोंद केली असून तपास पो.ना.महेंद्र महाडिक करीत आहेत.