कोंब्याची जत्रा घोडेमुख जत्रोत्सव २५ नोव्हेंबर रोजी

सावंतवाडी (प्रतिनिधी) : मातोंड-पेंडूर येथील स्वयंभू व जागृत देवस्थान अशी ख्याती असलेल्या श्री देव घोडेमुख देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव मंगळवार, २५ नोव्हेंबरला होत आहे. ही जत्रा कोब्यांची जत्रा म्हणूनही प्रसिद्ध आहे. यानिमित्त सकाळपासून केळी ठेवणे, नवस फेडणे, नवस बोलणे आदी कार्यक्रम होणार आहेत. या वार्षिक जत्रोत्सवाला भाविकांनी उपस्थित राहून देवदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन समस्त गावकर मंडळी व देवस्थान कमिटी, मातोंड यांनी केले आहे.

error: Content is protected !!