वाभवे -वैभववाडी नगरपंचायत नगराध्यक्षा श्रद्धा रावराणे, माजी सभापती बंड्या मांजरेकर यांनी पुष्पगुच्छ देऊन केले अभिनंदन
वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुका संजय गांधी निराधार योजना समितीच्या अध्यक्षपदी अनंत फोंडके यांची निवड झाली आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार नुतन तालुका कार्यकारिणी निवडण्यात आली आहे. वैभववाडी तालुक्याच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते अनंत फोंडके यांची निवड झाली आहे. फोंडके हे गेली अनेक वर्षे या माध्यमातून काम करीत आहेत. तालुक्यातील अनेक गरजू महिला व निराधार व्यक्तींना त्यांनी या योजनेचा लाभ मिळवून दिला आहे. त्यांच्या या कामाची दखल घेऊन पालकमंत्री नितेश राणेंच्या शिफारशीनुसार त्यांची निवड करण्यात आली आहे. या निवडी बद्दल भाजपा वैभववाडीच्या वतीने वाभवे-वैभववाडी नगरपंचायत नगराध्यक्षा श्रद्धा रावराणे, माजी सभापती बंड्या मांजरेकर यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले.
यावेळी नगरसेवक शिवाजी राणे, सुंदराबाई निकम, भाजपा शहराध्यक्ष आशिष रावराणे, बुथ अध्यक्ष मंदार रावराणे, हेत सरपंच किशोर कांबळे, मनोहर फोंडके, बंधु वळंजू, उदय पांचाळ आदी पदाधिकारी उपस्थित होते.












