प्राणजीवन सहयोग संस्थेच्या वतीने सावंतवाडीत जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा यशस्वी
सावंतवाडी (प्रतिनिधी) : बुद्धिबळ हा खेळ केवळ मोहऱ्यांचा नाही, तर संयम, विचारशक्ती आणि निर्णयक्षमता विकसित करणारा जीवनाचा धडा आहे, असे प्रतिपादन प्राणजीवन सहयोग संस्था, शिरवलचे संस्थाध्यक्ष संदिप चौकेकर यांनी केले. त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून संस्थेच्या वतीने सावंतवाडी येथील कळसुलकर हायस्कूल येथे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या स्पर्धेला स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
ही स्पर्धा मनिष मारुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्विस लीग अंतर्गत यशस्वीरित्या पार पडली. यात खुल्या गटात प्रथम क्रमांक सुश्रुत नानल, द्वितीय बाळकृष्ण पेडणेकर, तृतीय संदिप धुरी, जेष्ठ खेळाडू गटात प्रथम क्रमांक भिसाजी तानावडे, द्वितीय बळीराम आडेलकर, तृतीय निळकंठ मणेरीकर, १६ वर्षाखालील गटात प्रथम क्रमांक यथार्थ डांगी, द्वितीय प्रतीक देसाई, तृतीय रुद्रा मोबारकर, महिला गटात प्रथम गार्गी सावंत, द्वितीय भूमी कामत, तृतीय तनिष्का आडेलकर, तसेच सावंतवाडी उत्कृष्ट खेळाडू प्रथम विराज दळवी, द्वितीय हर्ष राऊळ, तृतीय पार्थ गावकर यांनी पटकावला. प्रत्येक गटातील विजेत्यांना प्रमाणपत्रे, ट्रॉफी आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय खेळाडूंसह, सोहम देशमुख, लिलाधर वराडकर, अक्षय देवलकर, जुई राजेंद्र उबाळे, मयूरेश परुळेकर, मिनल सुलेभवी, संतोष गंगनाईक, वशांत गवस, अथर्व वेंगुर्लेकर, पार्थ वझे, चिदानंद रेडकर, वैभव राऊळ, अन्वय सापळे आणि दुर्वांक मलबारी यांनी आपापल्या गटात उल्लेखनीय कामगिरी केली.
या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी संस्कार नॅशनल स्कूल चेअरमन आणि कळसुलकर स्कूल संचालक शैलेश पई उपस्थित होते. बक्षीस वितरण समारंभाला संदिप चौकेकर, केंकरे, बाबली कृष्णा गावडे, भिसाजी तानावडे, चंद्रकांत रणशूर, संदिप धुरी, आडेलकर, शशिकांत साळगावकर यांच्यासह पंच मनिष मारुलकर, परीक्षक राजेंद्र तवटे, सुयोग धामापुरकर तसेच आयोजक गितेश शेणई, श्रीकांत तानावडे आणि संस्थेचे सर्व प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरवी घाटे यांनी केले.












