जिल्ह्यात महायुती होणार की स्वबळावर ?
जिल्हावासीयांचे खा. राणेंच्या पत्रकार परिषदेकडे लक्ष
कणकवली (प्रतिनिधी) : माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांची थोड्याच वेळात पत्रकार परिषद होत आहे. जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपरिषद नगरपंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर खा. राणेंची महत्वपूर्ण पत्रकार परिषद होत असून या पत्रकार परिषदेत खा. राणे काय बोलतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. महायुती न करता भाजपाच्या नेत्यांकडून सिंधुदुर्गात स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहेत. तर शिवसेनेच्या नेत्यांकडून ही स्वबळाची तयारी असल्याचं म्हटलं जातेय. या पार्श्वभूमीवर खासदार नारायण राणे काय बोलणार ? सिंधुदुर्गात भाजपा शिवसेना महायुतीतून एकत्र लढणार की स्वबळावर ? या प्रश्नांची उत्तरे खासदार राणे यांच्या आजच्या पत्रकार परिषदेत स्पष्ट होणार आहे.त्यामुळे खा. नारायण राणे यांच्या आजच्या पत्रकार परिषदेकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.












