अखेर सिंधुदुर्गात भाजपा शिवसेना महायुती

खासदार नारायण राणे यांनी केले जाहीर

सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : सिंधुदुर्गात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजपा शिंदे शिवसेना महायुतीतून लढणार असल्याचे खासदार नारायण राणे यांनी आज कणकवली येथील पत्रकार परिषदेत जाहीर केले. त्यामुळे मागील काही दिवस सिंधुदुर्गात भाजपा शिवसेना आमनेसामने येणार अशा सुरू असलेल्या बातम्यांना आता पूर्णविराम मिळाला आहे. याबाबत येत्या दोन दिवसांत शिक्कामोर्तब होईल. भाजपा आणि शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांशी मी चर्चा केली आहे. त्यामुळे मी महायुती व्हावी या मताचा आहे.

error: Content is protected !!