डॉ.गुरमीत बछेर व डॉ.निता पाटील यांची खारेपाटण हायस्कूलला सदिच्छा भेट

खारेपाटण (प्रतिनिधी) : अपंग पुनर्वसन केंद्र, जिल्हा सिंधुदुर्ग या संस्थेच्या सदस्या तथा सोशालिस्ट डॉ.गुरमीत बछेर उर्फ ललिता बांदेकर व रिहॅबिलेटेशन क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट मुंबई येथील डॉ.निता पाटील यांनी नुकतीच खारेपाटण येथील शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय खारेपाटण या हायस्कूलला सदिच्छा भेट दिली. यावेळी खारेपाटण गावचे माजी सरपंच रमाकांत राऊत, सामाजिक कार्यकते व पत्रकार संतोष पाटणकर, खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव महेश कोळसुलकर, खारेपाटण हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य संजय सानप, पर्यवेक्षक संतोष राऊत आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

खारेपाटण हायस्कूलच्या वतीने शिक्षण संस्थेचे सचिव महेश कोळसुकर यांच्या शुभहस्ते डॉ.गुरमीत बछेर व डॉ.निता पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. ग्रामीण भागातील शाळांमध्ये शिक्षणात अप्रगत असणाऱ्या विद्यार्थ्यांवर काम करून त्यांना शिक्षणात पुढे आणण्यासाठी व शालेय परीक्षांविषयी विद्यार्थ्यांच्या मनात असलेली भीती दूर करण्यासाठी तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषा बोलता यावी यासाठी काम करणार असल्याचे डॉ.गुरमीत बछेर व डॉ.निता पाटील यांनी यावेळी सांगितले.

error: Content is protected !!