कणकवली (प्रतिनिधी) : भाजपाचे कणकवली नगरपंचायत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर नलावडे यांनी आपले राजकीय दैवत खासदार नारायण राणे यांची भेट घेत आशीर्वाद घेतले. समीर नलावडे उद्या शनिवारी आपला नगराध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तत्पूर्वी आज सायंकाळी नलावडे यांनी ओम गणेश बंगल्यावर जात खासदार राणे यांचे आशीर्वाद घेतले.
राजकीय दैवताचे आशीर्वाद घेतले, उद्या भरणार उमेदवारी अर्ज











