फोंडाघाट (प्रतिनिधी) : वंदे मातरम् या राष्ट्रीय गीताच्या १५० व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून औद्योगिक प्रशिक्षण संस्था, फोंडाघाट मार्फत तालुकास्तरीय चित्रकला, निबंध, वक्तृत्व,गायन व रांगोळी अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये न्यू इंग्लिश स्कूल, फोंडाघाट च्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले.
I)रांगोळी स्पर्धा
लहान गट
१)कु. श्रेया साहिल डोर्ले
(प्रथम क्रमांक)
२) कु. रावी विनायक सावंत (द्वितीय क्रमांक)
३) कु.सलोनी हनुमंत लाड
(तृतीय क्रमांक)
मोठा गट
१) कु. याज्ञिका महेश हळदिवे (तृतीय क्रमांक)
II)चित्रकला स्पर्धा
१)कु. यशदा अनिल भोगले (तृतीय क्रमांक)
III)गायन स्पर्धा
१). कु.मानसी महेश लाड
(प्रथम क्रमांक)
IV)निबंध स्पर्धा
१)कु ऋत्वी सुभाष सावंत
(प्रथम क्रमांक)
२)कु.सारा उल्हास लाड
(द्वितीय क्रमांक)
V)वक्तृत्व स्पर्धा
लहान गट
१)कु. निया सुहास एकावडे. ( प्रथम क्रमांक)
मोठा गट
१) कु.सेजल सखाराम हुंबे (प्रथम क्रमांक)
२) कु.पूजा रामचंद्र हुंबे (द्वितीय क्रमांक,)
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना गांगुर्डे,श्री.वाघमोडे, सौ.भोगले आणि सौ.पवार या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.सर्व यशस्वी विद्यार्थ्याचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन, सेक्रेटरी, खजिनदार,शाळा समिती चेअरमन,संचालक मंडळ, प्रशालेचे मुख्याध्यापक पी.के.पारकर, पर्यवेक्षक व्ही.पी.राठोड, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी हार्दिक अभिनंदन केले.











