“शपथ-राजीनामा-शपथ” चा आता ‘पार्थ 2’ – संदीप सरवणकर

वैभववाडी (प्रतिनिधी) : आधी सहकारी संस्था, मग साखर कारखाना यातील वडिलांनी केलेली भरीव कामगिरी चा अभिमान सार्थ वाटला म्हणून की काय..? “पार्थ” ला “पवार म्हणजे पॉवर” ह्याचा कुठे तरी जास्तच हिय्या वाटून, त्यांनी आपल्या अमोडिया कंपनीला (सरकारची स्टॅम्प ड्यूटी न भरता) हजारो कोटींची जमीन शेकडो मध्ये मिळवून दिली. म्हणजे त्याला मिळालेले बाळकडू, हे चांगलेच मिळाले असे दिसते. परंतु, आता हे सरकार त्याचा नाद करणार नाही, कारण अजित दादांनी वर्षावर माफीनामा ऐवजी राजीनामा देऊ का? असेच ठणकावून सांगितल असे ऐकायला मिळते. एकूण काय? पहिल्या “शपथ-राजीनामा-शपथ” ह्या चलतपटाचा आता, ‘पार्थ 2’ सुद्धा महाराष्ट्राला पहायला मिळतोय, हे नक्की.

error: Content is protected !!