कणकवली (प्रतिनिधी) : वॉर्ड न. ९ मधून भाजपाच्या मेघा महेश सावंत यांनी पुन्हा एकदा आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आज कणकवली येथे निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांच्याकडे मेघा सावंत यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. मेघा सावंत या ९ नंबर वॉर्ड मधून यापूर्वी सुद्धा नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. पक्षश्रेष्ठींनी पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास दाखवत वॉर्ड नंबर ९ मधून त्यांना उमेदवारी बहाल केली आहे.
मेघा सावंत यांचा वॉर्ड न. ९ मधून भाजपा कडून उमेदवारी अर्ज दाखल












