वायंगणी हायस्कूलच्या स्मार्ट क्लास रूमला HDFC बँकेच्या झोनल मँनेजर तनिया पाल यांची सदिच्छ भेट

आचरा (प्रतिनिधी) : ज्ञानदीप माध्यमिक विद्यालय वायंगणी प्रशालेमध्ये वनराई संस्था व एच. डी. एफ. सी. बँकेच्या माध्यमातून बांधण्यात आलेल्या “स्मार्ट क्लासरुम” या व्हर्च्युअल वर्गाला एच. डी. एफ.‌ सी. बँकेच्या झोनल हेड-तनिया पाल (कार्पोरेटर सोशल रिस्पॉन्स सिबीलीटी फाँर नाँर्थ ईस्ट, वेस्ट अँड पँन इंडिया प्रोजेक्ट) यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत बँकेचे सी. एस. आर. मँनेजर विनीत जाधव, रिजनल प्रोजेक्ट मँनेजर ऋषिकेश, निलेश तेजम, स्वराज पेडणेकर, संस्थाध्यक्ष हनुमंत प्रभू, संतोष वायंगणकर, मुख्याध्यापक टकले, तोंडवळी इंजिनिअर काँलेजचे प्राचार्य सातवसे उपस्थित होते.

तनिया पाल यांच्या हस्ते प्रथम स्मार्ट क्लासरुमचे फित कापून उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर तनिया पाल यांनी विद्यार्थी वर्गाशी संवाद साधला. विद्यार्थ्यांशी हितगुज करून समाधान व्यक्त केले. संस्थाध्यक्ष हनुमंत प्रभु यांनी उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन संस्था व शाळेच्या वतीने स्वागत केले. तसेच छोट्याशा ग्रामीण भागातील शाळेला तांत्रिक जगाचे द्वार खुले करून दिल्याबद्दल आभार व्यक्त केले व धन्यवाद दिले. असेच सहकार्य भविष्यातही मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शाळेचे ज्येष्ठ शिक्षक संजय जाधव यांनी केले, तर आभार शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका केतकी बावकर यांनी मानले.

error: Content is protected !!