कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली नगरपंचायत निवडणूकसाठी वॉर्ड क्रमांक 9 मधून आकांक्षा अभय राणे ह्या सोमवारी भाजपाकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत अशी माहिती माजी नगरसेवक अभय राणे यांनी दिली.आकांक्षा राणे ह्या कणकवली नगरपंचायत चे माजी नगरसेवक तथा माजी बांधकाम सभापती अभय राणे यांच्या पत्नी आहेत. आज वॉर्ड 9 मधून भाजपाकडूनच माजी नगरसेविका मेघा महेश सावंत यांनी भाजपाकडून आपली उमेदवारी दाखल केली. आकांक्षा राणे ह्यासुद्धा उमेदवारी दाखल करणार असल्यामुळे उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशीच वॉर्ड 9 मधील चित्र स्पष्ट होणार आहे.
आकांक्षा राणे वॉर्ड 9 मधून उद्या दाखल करणार उमेदवारी












