रामलाल जे बघाडीया चॅरिटेबल ट्रस्ट’ च्या वतीने वाटप
फोंडाघाट (प्रतिनिधी) : नवीन कुर्ली प्राथमिक शाळा येथे नवीन कुर्ली ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र कोलते आणि नायब तहसीलदार दिलीप पाटील यांच्या प्रयत्नातून आज ‘रामलाल बघाडीया चॅरिटेबल ट्रस्ट’ च्या वतीने विविध शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले या मध्ये मुलांसाठी दप्तरे, वह्या,पेन यांच वाटप करण्यात आले. हे शैक्षणिक साहित्य सामाजिक कार्यकर्ते गोविंद कामतेकर यांनी विशेष प्रयत्न करून उपलब्ध करून दिले. ते स्वतः या कार्यक्रमाला सहकुटुंब उपस्थित होते यावेळी शाळेच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सामाजिक कार्यकर्ते गोविंद कामतेकर यांचा सत्कार करण्यात आला तसेच रामलाल बघाडीया ट्रस्ट चे आभार व्यक्त करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन वरवडेकर मॅडम तर आभार मुख्याध्यापक जोशी मॅडम यांनी मानले.
या कार्यक्रमावेळी सामाजिक कार्यकर्ते गोविंद कामतेकर, ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र कोलते, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अमित दळवी, सत्यवान मडवी, करूळ तलाठी गवस मॅडम, मुख्याध्यापिका रेणुका जोशी, बाळकृष्ण चव्हाण, सखाराम हुंबे, कृष्णा पवार, आशिष पेडणेकर, अनंत दळवी, विजय आग्रे, केशव दळवी, मंगेश मडवी, प्रशांत दळवी, प्रकाश आग्रे, गजानन पवार, शिवाजी चव्हाण, अंगणवाडी सेविका कामतेकर, शाळेतील सर्व शिक्षक वृंद, विध्यार्थी, ग्रामस्थ उपस्थित होते.












