ॲड. अनिल निरवडेकर भाजपाकडून नगरसेवक पदासाठी निवडणूक रिंगणात

प्रभाग १० साठी उमेदवारी अर्ज केला दाखल

सावंतवाडी (प्रतिनिधी) : येथील ज्येष्ठ वकील अनिल निरवडेकर यांनी भाजपमधून आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केला आहे. ते १० नंबर प्रभागातून निवडणुकीला सामोरे जात आहेत. विकासाच्या मुद्द्यावर आपण ही निवडणूक लढवत आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. ते उच्चशिक्षित असून स्वतः वकील असल्यामुळे त्यांचा लोकसंपर्क दांडगा आहे. त्यामुळे भाजपकडून त्यांना संधी देण्यात आली आहे. ते भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे कट्टर समर्थक मानले जातात.

error: Content is protected !!