फोंडाघाट (प्रतिनिधी) : सोमवार, दि. 17 नोव्हेंबर, 2025 रोजी अध्ययन केंद्र कोळोशी यांच्यामार्फत नारायण आश्रम कोळोशी येथे पार पडलेल्या वर्तुळ या गणिती घटकावर आधारित कणकवली तालुकास्तरीय ऑलंपिक प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये अ. वि. फडणीस माध्यमिक विद्यामंदिर घोणसरी या प्रशालेच्या विद्यार्थ्यांना प्रथम क्रमांक मिळाला. सेजल विजय रासम, दिव्या संतोष राणे आणि संघातील सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र ट्रॉफी आणि भेटवस्तू पारितोषिक स्वरूपात देण्यात आले. विद्यार्थ्यांना गणित शिक्षिका जननी पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे अध्यक्ष ॲड. अप्पा राणे, प्रशालेचे चेअरमन भाई राणे तसेच मुख्या. श्री. राजम यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे, शिक्षिका श्रीमती पाटील यांचे अभिनंदन केले.
गणित ऑलिंपिक स्पर्धेत घोणसरी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा प्रथम क्रमांक











