कणकवलीत सीएनजी पंप सुरु

कणकवली (प्रतिनिधी) : बहुप्रतिक्षित असलेला कणकवली येथील सीएनजी पंप अखेर 18 नाेव्हेंबर राेजी संध्याकाळपासून सुरु झालेला आहे. कणकवली शहरातील सीएनजी वाहन धारकांना आपल्या कारमध्ये किवा वाहनांमध्ये सीएनजी भरण्यासाठी ओराेस,फाेंडाघाट,तळेरे येथे जावं लागत असे.साहजिकच याच्यामध्ये पेट्राेल आणि येता जाता लागणारा सीएनजी यामुळे आर्थिक नुकसान हाेत असे.कणकवली शहरामध्ये सीएनजी पंप सुरु व्हावा अशी सीएनजी वाहनधारक तसेच सीएनजी धारक रिक्षा चालकांची सुद्धा मागणी हाेती.आणि त्यानुसार कणकवली एसटी स्टॅंड नजिकच्या पेट्राेल पंपावरती सीएनजी पंप सुरु झाला असून कणकवली शहरातील सीएनजी धारक वाहनांना दिलासा मिळाला आहे.

error: Content is protected !!