कुडाळ तहसीलदारपदी सचिन पाटील यांची नियुक्ती

कुडाळ (प्रतिनिधी) : कुडाळ तहसीलदार पदाचा कार्यभार सचिन पाटील यांनी स्वीकारला असून ते यापूर्वी महाराष्ट्र राज्याचे महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांच्या मंत्रालयातील कार्यालयात कार्यरत होते. त्यांची बदली कुडाळ येथे झाल्याने रिक्त असलेले तहसीलदारपद भरले गेले. माजी तहसीलदार वीरसिंग वसावे यांची बदली रत्नागिरी येथे झाल्यानंतर हे पद रिक्त होते.

सोमवारी सचिन पाटील यांनी औपचारिकरित्या पदभार स्वीकारला. यापूर्वी त्यांनी चंद्रपूर आणि गोंदिया या ठिकाणी काम केले आहे. पदभार स्वीकारल्यानंतर विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी त्यांचे स्वागत केले.

सर्वसामान्यांसाठीच्या शासकीय योजना प्रभावीपणे राबवून त्या अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन तहसीलदार सचिन पाटील यांनी या वेळी दिले.

error: Content is protected !!