खारेपाटण महाविद्यालयाचा विद्यार्थी यश पाटील याची सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी संघात निवड

खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील नडगीवे बांबरवाडी गावचा सुपुत्र तथा खारेपाटण येथील कला वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी यश मेघा संजीव पाटील याची नुकतीच १९ वर्षाखालील सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी संघात निवड झाली असून यश याच्या या निवडीबद्दल त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे.

यश याला लहान असल्यापासून कबड्डीची आवड असून विविध शालेय तसेच प्रायोजित खाजगी स्पर्धांमध्ये त्याने उत्तम खेळाचे प्रदर्शन केले आहे. तर शिवगर्जना मित्र मंडळ नडगीवे या मंडळाचा तो खेळाडू असून शिवगर्जना संघाच्या माध्यमातून विविध कबड्डी सामने त्याने खेळलेले आहेत. त्याच्या या खेळाची दखल क्रीडा शिक्षक व अधिकारी यांनी घेऊन नुकतीच त्याची सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी संघात निवड झाली आहे.

त्याच्या या यशाबद्दल नडगीवे गावचे सुपुत्र व शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुंबई दक्षिण जिल्हा उपाध्यक्ष आणि नडगीवे बांबरवाडी ग्रामस्थ मंडळ मुंबईचे चिटणीस सुभाष पाटील यांनी अभिनंदन केले आहे. तर खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे, खारेपाटण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. डी. कांबळे, खारेपाटण हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे मुख्याध्यापक संजय सानप, पर्यवेक्षक संतोष राऊत तसेच सर्व संचालक मंडळ सदस्य आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांच्या वतीने यश पाटील याचे अभिनंदन करण्यात येत आहे.

error: Content is protected !!