कणकवलीत उद्या पाणीपुरवठा बंद

नागरिकांना नगरपंचायतीचे आवाहन

कणकवली (प्रतिनिधी) : कनकनगर बंधारा जॅकवेल येथील ट्रान्सफॉर्मरमध्ये अचानक बिघाड झाल्याने 21 नोव्हेंबर 2025 रोजी संपूर्ण कणकवली शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती कणकवली नगरपंचायतीकडून देण्यात आली आहे.

ट्रान्सफॉर्मर दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करण्यात आले असून पूर्ण दुरुस्ती होईपर्यंत पाणीपुरवठा सुरू करता येणार नाही, असे नगरपंचायतीने स्पष्ट केले आहे. अचानक उद्भवलेल्या परिस्थितीमुळे नागरिकांनी आवश्यक ते पाणी साठवून ठेवावे, तसेच सहकार्य करावे, असे आवाहनही नगरपंचायतीतर्फे करण्यात आले आहे.

error: Content is protected !!