शहर विकास आघाडीच्या शीतल मांजरेकर, उमेश वाळके, जाई मुरकर यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन
कणकवली (प्रतिनिधी) : शिवसेना आमदार निलेश राणे यांनी कणकवली नगरपंचायत निवडणूकीत सक्रिय होत शहर विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन केले. आमदार निलेश राणे यांच्या हस्ते फित कापून वॉर्ड क्रमांक 10 च्या उमेदवार शीतल मांजरेकर यांच्या आणि वॉर्ड क्रमांक 4 व 16 चे उमेदवार जाई मुरकर आणि उमेश वाळके यांच्या शिवाजीनगर येथील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. तर सतीश सावंत आणि संजय आग्रे यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आले. यावेळी शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संदेश पारकर, माजी आमदार राजन तेली, उमेदवार शीतल मांजरेकर, उमेश वाळके, जाई मुरकर, काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर, प्रवीण वरुणकर, कन्हैया पारकर, हरेश पाटील, शेखर राणे, दिवाकर मुरकर, सोहम वाळके, नागेश मोरये, सुजित जाधव, दीपिका जाधव आदी उपस्थित होते.













