खारेपाटण जि.प.केंद्र शाळा नं.१ येथे २५ रोजी बाल, कला, क्रीडा व ज्ञानी मी होणार केंद्रस्तरीय महोत्सवाचे आयोजन

खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने दरवर्षी शालेय विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या बाल, कला, क्रीडा व ज्ञानी मी होणार केंद्रस्तरीय महोत्सव २०२५ चे आयोजन यंदा जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ येथे केंद्राच्या वतीने करण्यात आले असल्याची माहिती शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर यांनी दिली.

‘अधिक उंच, अधिक जलद व अधिक बुद्धिमान’ हे ब्रीद वाक्य असलेल्या या क्रीडा महोत्सवासाठी जि.प.केंद्र शाळा खारेपाटण नं.१ येथे जोरदार तयारी सुरू असून खारेपाटण केंद्रातील एकूण ९ शाळांचा या स्पर्धेमध्ये सहभाग असणार असून कबड्डी, खो – खो, उंच उडी, लांब उडी, गोळा फेक, थाळी फेक, ५० / १०० / २०० मीटर धावणे, समूह गान, समूह नृत्य व ज्ञानी मी होणार आदी खेळांचा यामध्ये समावेश असणार आहे.

तसेच या केंद्रस्तरीय क्रीडा महोत्सव करीता खारेपाटण सरपंच प्राची ईसवलकर व उपसरपंच महेंद्र गुरव, खारेपाटण जि.प. केंद्र शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्राप्ती कट्टी, केंद्रप्रमुख गोपाळ जाधव आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तर या स्पर्धेसाठी क्रीडाप्रमख म्हणून संदीप कदम व उपक्रीडाप्रमुख राजेश तेरवनकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

error: Content is protected !!