तर शिक्षिका अमृते यांचेकडून स्टँड फॅन भेट

खारेपाटण (प्रतिनिधी) : रोटरी क्लब ऑफ खारेपाटण या संस्थेमार्फत पंचक्रोशी मध्ये विविध समाज उपयोगी उपक्रम राबविले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून रोटरी क्लब ऑफ खारेपाटणचे रोटरियन व खारेपाटण जुनिअर कॉलेजचे सहाय्यक शिक्षक अजय गुरसाळे यांचेकडून सुमारे रुपये २५०००/- किमतीचे डायस (Podium) नुकताच शाळेला भेट स्वरूपात देण्यात आला.

तसेच प्रशालेतील माध्यमिक विभागातील सहाय्यक शिक्षिका व रोटरियन अमृते यांनी देखील शाळेला स्टँड फॅन भेट स्वरूपात दिला. रोटरी क्लब खारेपाटण च्या सर्व सदस्यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी कार्य नेहमीच केले जाते. रोटरी क्लब खारेपाटण च्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.
याप्रसंगी खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे, उपाध्यक्ष भाऊ राणे, सचिव महेश कोळसुलकर, सर्व विश्वस्त तसेच सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार संतोष पाटणकर व रोटरी क्लब ऑफ खारेपाटण चे अध्यक्ष दयानंद कोकाटे, प्राचार्य संजय सानप, पर्यवेक्षक राऊत व सर्व शिक्षक कर्मचारी व रोटरी क्लब खारेपाटण चे सर्व रोटरियन यावेळी उपस्थित होते. सर्व उपस्थित मान्यवरांनी श्री गुरसाळे व सौ. अमृते यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या व शाळेला भेट वस्तू दिल्याबद्दल आभार व्यक्त केले.












