देवगड (प्रतिनिधी) : देवगड रोटरी क्लब ऑफ मँगो सिटी आणि डॉ. फॅटरनिटी क्लब यांच्या संयुक्त विद्यमानाने देवगडच्या पर्यटन वाढीसाठी दौड आरोग्यासाठी साथ देवगड पर्यटनाच्या घोषवाक्य सहीत रविवार, 23 नोव्हेंबर रोजी देवगड रनचे आयोजन येथे करण्यात आले आहे.
शनिवारी देवगड रनच्या टी-शर्टचे अनावरण रोटरी क्लब ऑफ मँगो सिटीच्या अध्यक्ष गौरव पारकर, हनीफ मेमन, दयानंद पाटील, अनिल गांधी, डॉक्टर किरण पाटणकर, विजय बांदिवडेकर, अनिकेत बांदिवडेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
या स्पर्धेचा शुभारंभ रविवारी सकाळी ५:३० वाजता हॉटेल डायमंड येथून होणार आहे. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा ५ किलोमीटरसाठी 11 किलोमीटर व 21 किलोमीटरसाठी आयोजित करण्यात आली आहे.












