वेंगुर्ले शहरातील कामगार कुटुंबीयांची भेट घेऊन भाजपा सरकारने कामगारांसाठी केलेल्या भरीव कार्याची माहीती देणार
केंद्र सरकारने ऐतिहासिक निर्णय घेत चार कामगार संहीता तात्काळ लागु केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कामगार वर्गाकडून जाहीर आभार – अशोक राणे, जिल्हा संयोजक, भाजपा कामगार मोर्चा
वेंगुर्ला (प्रतिनिधी) : वेंगुर्ला नगरपरिषद निवडणूक पार्श्वभूमीवर आज भाजपा कामगार मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अशोक राणे तसेच भाजपा प्रणित सेवा शक्ती संघर्ष एस टी कर्मचारी संघ वेंगुर्ला आगारातील पदाधिकारी यांनी वेंगुर्ला भाजपा कार्यालयात भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तसेच सेवा शक्ती संघर्ष एस टी कर्मचारी संघ वेंगुर्ला अध्यक्ष बाळू देसाई यांची भेट घेण्यात आली. यावेळी अनेक विषयावर चर्चा करून होणाऱ्या नगरपंचायत निवडणुकीत भाजपा सर्व उमेदवार यांना पूर्ण पाठिंबा देण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले, तसेच वेंगुर्ले शहरातील कामगारांची भेट घेऊन भाजपा सरकारने कामगारांसाठी जे सकारात्मक निर्णय घेतले त्यांची माहीती दिली जाईल असे सांगितले.
या वेळी सेवा शक्ती संघर्ष विभागीय सचिव भरत चव्हाण, वेंगुर्ला आगार सचिव दाजी तळवणेकर, विभागीय उपाध्यक्ष संजय सावंत, कणकवली आगार अध्यक्ष मनोजकुमार पवार, उदय मसुरकर, विजयदुर्ग आगार सचिव रोहन शिंदे, वेंगुर्ला आगार उपाध्यक्ष भाऊ सावळ, अनंत झोरे, प्रकाश मोहिते, प्रशांत खानोलकर, शरद मेस्त्री अन्य सभासद उपस्थित होते.












