कणकवलीच्या रणांगणात मंत्री सामंतांची होणार एन्ट्री

शहर विकास आघाडीसाठी आमदार निलेश राणेंच्या सोबत आज कॉर्नर सभा

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली नगरपंचायत निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले असून आज सोमवारी शहरात जोरदार राजकीय रंगत पाहायला मिळणार आहे. राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत हे शहर विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सायंकाळी ७ वाजता कणकवलीत येणार असून कणकवली बाजारपेठेतील ढालकाठी येथे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असलेल्या माजी नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या घराजवळ कॉर्नर सभा घेणार आहेत. या सभेला आमदार निलेश राणे देखील उपस्थित राहणार आहेत. या दोन्ही नेत्यांची आजच्या सभेत काय भूमिका राहते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेषतः जिल्ह्यात भाजप–शिवसेना युती न झाल्यामुळे शिंदे गटामध्ये असलेली नाराजी लक्षात घेता, मंत्री सामंत आज काय भूमिका मांडतात याबाबत उत्सुकता आहे.

निवडणुकीत उभारलेल्या शहर विकास आघाडीत उबाठा शिवसेना, शिंदे शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांचा सहभाग आहे. दरम्यान, आमदार निलेश राणे यांनी शहर विकास आघाडीला विजय मिळवून देण्याची जबाबदारी स्वतः घेतली असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आजच्या सभेत ते शहरवासीयांना कसे आश्वासित करतात, याकडे कणकवलीकरांचे विशेष लक्ष आहे.

error: Content is protected !!