जयवंत कोडक व इतरांवर तात्काळ कारवाईची मागणी
कोल्हापूर (प्रतिनिधी) : छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय कोल्हापूर येते रिपब्लिकन पक्षाच्या वतीने मयत कुमार कांबळे राहणार सांगरूळ तालुका करवीर याला न्याय देण्यासंदर्भात आंदोलन करण्यात आले मयत कुमार आनंदा कांबळे हा मेनन अँड मेनन कंपनी विक्रम नगर कोल्हापूर येथे गेली सहा वर्ष कॉन्ट्रॅक्ट बेस वरती मशीन ऑपरेटर म्हणून काम करत होता दिनांक 10 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री 12 ते 8 या शिफ्ट साठी काम करण्यासाठी गेला असता त्या रात्रीमध्ये त्याच्यावरती छोटा कीपॅड चा मोबाईल चोरी केला म्हणून त्याच्यावर चोरीचा आळ घेऊन मेनन अँड मेनन कंपनीचे सिक्युरिटी इन्चार्ज पार्ले तसेच त्या शिफ्ट मध्ये काम करणारे सुपरवायझर डोंगळे तसेच मेन कॉन्ट्रॅक्टर घाडगे तसेच या सगळ्यांना जबाबदार असणारे कॉडनेट करणारे मेनन अँड मेनन कंपनीचे HR जयवंत कोडक यांनी जातीवादी द्वेषातून तसेच गेली सहा वर्ष त्या ठिकाणी हा कामगार काम करतोय म्हणून तसेच याला पर्मनंट करावे लागेल यासाठी वरील सर्वांनी याच्यावरती कोणतीही चूक नसताना चोरीचा आळ घालून याच्याकडून सिक्युरिटी इन्चार्जर पार्ले यांनी स्वतः लेटर टाईप करून त्या लेटर वरती जबरदस्ती कुमार कांबळे ची सही घेऊन त्याला चोर ठरवून नाहक व विनाकारण बदनाम करून त्याला कंपनीतून कामावरून कमी केले.

गेल्याच वर्षी याचे लग्न होऊन एक वर्ष झाले असून याच्या पाठीमागे आई-वडील आणि भाऊ असा परिवार आहे या सर्व परिवाराची जबाबदारी तसेच आई-वडिलांचे औषध पाण्याची जबाबदारी संबंधित कामगार कुमार कांबळे वरती असल्यामुळे तो हताश झाला तसेच त्याच्यावरती चोरीचा आळ घेतल्यामुळे त्याला न सहन झाल्यामुळे त्याने गेले दोन ते तीन महिने संबंधित कंपनीतील कॉन्ट्रॅक्टर घाडगे सुपरवायझर डोंगळे या सर्वांना फोन करून मी कोणतीही चूक केली नाही चोरी केलेली नाही अशी वेळोवेळी सफाई देऊन ही याचं कोणीही न ऐकल्यामुळे शेवटी हताश होऊन शुक्रवार दिनांक 21/11 /2025 रोजी दुपारी दोन वाजता मयत कुमार कांबळे यांनी तन नाशक औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला त्याचवेळी उपचारासाठी छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय कोल्हापूर येथे घेऊन आले असता आज दिनांक 24 /11 /2025 रोजी उपचारादरम्यान सकाळी साडेआठ ते नऊच्या दरम्यान त्याचा मृत्यू झाला. यावेळी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा सचिव सतीश माळगे यांना ही बातमी समजताच त्यांच्या कार्यकर्त्या समवेत कुंडलिक कांबळे, सरदार कांबळे, अजितकुमार सनदे, तानाजी भोसले,मनोज काळे तसेच गिरीश कांबळे यांच्या समवेत सीपीआरमध्ये धाव घेऊन बॉडी न स्वीकारण्यासंदर्भात तसेच जबाबदार संबंधित वरील सर्व आरोपींच्या वरती 306 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यासंदर्भात तसेच या सर्व आरोपींच्या वरती ॲट्रॉसिटी ॲक्ट गुन्हा दाखल करून या सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्यासंदर्भात रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले.












