कोल्हापूर महापालिकेच्या प्रारुप मतदारयादीतील गंभीर चुका आणि त्रुटी दूर करा

काँग्रेस शिष्टमंडळाचे आयुक्त तथा प्रशासक यांना निवेदन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठीच्या प्रारुप मतदारयादीतील गंभीर चुका आणि त्रुटी प्रशासनाने तात्काळ दूर कराव्यात यासाठी माजी आमदार ऋतुराज संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे माजी नगरसेवक, इच्छुक उमेदवार तसेच काँग्रेस कार्यकर्ते यांच्या व्यापक शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त तथा प्रशासक यांना निवेदन दिले.

यामध्ये खालील प्रमुख मुद्द्यांचा समावेश होता.
१) प्रारूप मतदार यादीमध्ये काही प्रभागातील हजारहून अधिक मतदारांची नावे दुसऱ्या प्रभागात समाविष्ट करण्यात आली आहेत. प्रशासनाने अशा सर्व चुका शोधून स्वतःहून त्याबाबत दुरुस्ती करावी तसेच प्रभागासाठी एकत्रित हरकतसुद्धा स्वीकारावी.

2) या प्रारूप मतदारयादीत तब्बल 32 हजार 250 मतदारांची नावे दुबार असल्याची बाब निवडणूक आयोगाने निदर्शनास आणली आहे. ही संख्या अजून मोठी असण्याची शक्यता असून त्यामुळे बोगस मतदानाची शक्यता वाढते. या दुबार नावांबाबत प्रशासनाने ठोस कार्यवाही करावी.

3) प्रारूप मतदार यादीत बऱ्याच ठिकाणी मतदारांचे पत्ते एकतर अपूर्ण आहेत, चुकीचे आहेत किंवा काही ठिकाणी वाचता येत नाहीत. त्यामध्ये योग्य ती दुरुस्ती करावी.

4 ) या निवडणुकीसाठी प्रशासनाने वेबसाईटवर प्रसिद्ध केलेल्या मतदारयाद्या डिजिटली वाचण्यायोग्य नाहीत. त्या वाचण्यायोग्य कराव्या.

5) वेबसाईटवर प्रसिद्ध केलेल्या यादीत मतदारांचे फोटो नाहीत. जिल्हा परिषद निवडणुकीसाठीच्या मतदार यादीप्रमाणेच महापालिका मतदार यादी फोटोंसह वेबसाईटवर प्रसिद्ध करावी.

6) नागरिकांना नाव शोधण्यासाठी मोबाईल- फ्रेंडली लिंक द्यावी.

7) प्रारूप मतदार यादीवर हरकती घेण्याची मुदत वाढवून द्यावी.

या सर्व मुद्द्यांची दखल घेत याबाबत तात्काळ सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन प्रशासकांनी दिले.

यावेळी राजेश लाटकर, दौलत देसाई,भिमराव पवार, माणिक मंडलिक,विक्रम जरग, संजय मोहिते, दुर्वास कदम,भूपाल शेटे, सुभाष बुचडे, प्रतापसिंह जाधव, इंद्रजीत बोंद्रे, विजय सुर्यवंशी, विनायक फाळके,भारती पवार, जय पटकारे, सुरेश ढोणुक्षे, उत्तम शेटके, फिरोज सौदागर, आर. डी. पाटील, काकासाहेब पाटील, रियाज सुभेदार, रविंद्र आवळे, किशोर यादव, धनंजय सावंत, अजित पोवार, अभिजीत देठे, शिवानंद बनछोडे ,युवक काँग्रेसचे दीपक थोरात, एनएसयूआयचे अक्षय शेळके, यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!