कणकवली (प्रतिनिधी) : ठाकरे शिवसेनेचे नेते तथा माजी आ. परशुराम उपरकर यांची कन्या पूर्वजा हिचा विवाह मितेश दळवी यांच्या समवेत 23 नोव्हेंबर रोजी मुंबई एमसीए क्लब येथे पार पडला. या विवाह सोहळ्याला राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे, पत्नी रश्मी ठाकरे, रश्मी ठाकरे यांच्या मातोश्री श्रीमती. पाटणकर आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. विवाह सोहळा पार पडल्यामुळे माजी आ. परशुराम उपरकर हे 25 नोव्हेंबरला सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या निवडणूक प्रचारात सहभागी होण्यासाठी दाखल होणार आहेत.
उद्धव ठाकरेंनी माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या मुलीच्या विवाहाला लावली उपस्थिती












