सिंधुदुर्ग साईकृपा बहुउद्देशीय शिक्षण संस्था कसाल या संस्थेचे पुरस्कार जाहीर

अर्जुन रावराणे विद्यालयाचे कलाशिक्षक मंदार चोरगे यांचा सिंधुरत्न पुरस्काराने सन्मान

३ डिसेंबर रोजी बॅरिस्टर नाथ पै सभागृहात पुरस्कार सोहळ्याचे आयोजन

वैभववाडी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग साईकृपा अपंगशक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था कसाल यांच्या वतीने दरवर्षी शैक्षणिक, सामाजिक व अन्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींची दखल घेऊन त्यांना संस्थेच्या वतीने सन्मानित करण्यात येते. या पार्श्वभूमीवर शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल वैभववाडी येथील अर्जुन रावराणे विद्यालयाचे कलाशिक्षक मंदार सदाशिव चोरगे यांना संस्थेच्या वतीने सिंधुरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. बुधवार दि.३ डिसेंबर, २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता बॅरिस्टर नाथ पै सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे. या पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

error: Content is protected !!