नितेश राणे, प्रभाकर सावंतांसह सह सर्व उमेदवार सहभागी
कणकवली बाजारपेठेतून नगरपंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर
कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली बाजारपेठेतून नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री नितेश राणे यांच्यासह भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या नेतृत्वाखाली पटकीदेवी मंदिरापासून पटवर्धन चौकापर्यंत महारॅली काढण्यात आली. या महारॅलीच्या माध्यमातून कणकवली बाजारपेठेतील सर्व मतदारांशी पालकमंत्री नितेश राणे यांनी सुसंवाद साधत भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केले. यावेळी भाजपाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर नलावडे यांच्यासह भाजपाचे 16 ही नगरसेवक पदाचे उमेदवार आणि भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस युतीचे प्रभाग 17 मधील राष्ट्रवादी काँग्रेस चे उमेदवार अबिद नाईक हे उपस्थित होते. भाजपा कार्यकर्त्यांनी भाजपाच्या विजयाच्या घोषणा देत कणकवली बाजारपेठ दणाणून सोडली होती.











