धार्मिक सांस्कृतिक क्रीडा कार्यक्रमासह “कृतज्ञतेचा सुवर्णसोहळा” लक्षणीय! सोहळा दोन दिवस
फोंडाघाट (प्रतिनिधी) : घोणसरी प्रकल्पग्रस्तांच्या विस्थापितांनी स्व. दाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली, अविरत कष्टातून उभारलेले जागृत देवस्थान, श्री देव ब्राह्मणेश्वर मंदिर! ब्रह्मनगरी, गावठण-फोंडाघाट येथील ह्या देवस्थान श्री देव ब्राह्मणेश्वर मंदिराचा २५ वा वर्धापन दिन तथा रौप्य महोत्सवी वर्ष सोहळा तारीख ४ डिसेंबर रोजी साजरा होणार आहे. यानिमित्त बुधवार तारीख ३ व गुरुवार तारीख 4 डिसेंबर रोजी धार्मिक, अध्यात्मिक, सांस्कृतिक, क्रीडा उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तारीख ४ रोजी आठ वाजता, गेल्या पंचवीस वर्षात देवस्थानाशी निगडित योगदान देणाऱ्या साठी “कृतज्ञतेचा सुवर्णसोहळा” व त्यावर विशेष चित्रफित सादर होणार आहे.
बुधवार तारीख ३ रोजी सायंकाळी चार ते सहा विविध वयोगटासाठी खेळ स्पर्धा, सायंकाळी सहा ते सात पारंपारिक लाठीकाठी व सहासी खेळ, आठ ते दहा कृतज्ञतेचा सुवर्णसोहळा व चित्रफित प्रदर्शन आणि रात्री दहा वाजता खेळ पैठणीचा कार्यक्रम होणार आहे. गुरुवार तारीख ४ डिसेंबर रोजी सकाळी आठ ते नऊ ग्रंथवाचन, नऊ ते दहा ब्राह्मणेश्वर अभिषेक, अकरा वाजता श्री सत्यनारायण महापूजा, एक ते तीन महाप्रसाद, सायंकाळी चार ते आठ पालखी मिरवणूक, रात्री नऊ वाजता महाराष्ट्राची लोकधारा (स्थानिक कलाकार) व अकरा वाजता बालकृष्ण दशावतारी नाट्य मंडळ कोळम-मालवण यांचे महान पौराणिक नाटक होणार आहे. या सोहळ्यात चित्रफीत संयोजन तनिष हिंदळेकर आणि उन्मेशा बांबरकर तर संपूर्ण कार्यक्रमाची संकल्पना व आयोजन करुणा चिंदरकर, सदानंद हिंदळेकर, ज्ञानेश चिंदरकर, जयवंत सावंत आणि सर्व सहकाऱ्यांनी नियोजनबद्ध केले आहे. तरी संपूर्ण सोहळ्यास भाविकांनी सहभागी व्हावे असे आवाहन संयोजन समितीकडून करण्यात आले आहे.












