१३ वा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात होणार साजरा
श्री संत सद्गुरू देवावतारी बाळू मामा नावाचा ट्रिकसीनयुक्त दशावतार नाट्यप्रयोग विशेष आकर्षण
आचरा (विवेक परब) : मालवण तालुक्यातील वायंगणी येथील श्री स्वामी समर्थ मठ येथे दि. ०१ डिसेंबर ते ०३ डिसेंबर, २०२५ रोजी १३ वा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. या निमित्ताने सोमवार दि. ०१ डिसेंबर, २०२५ रोजी सकाळी ८.०० वा श्री स्वामी समर्थ मठाकडून पालखी प्रस्थान व वायंगणी गावात पालखी परिक्रमा (महादेश्वर ढोलपथक नाडण, पुजारेवाडी), दुपारी १२.०० वा महाप्रसाद, श्री ठाणेश्वर मंदिर वायंगणी येथे सौजन्य श्री ठाणेश्वर सेवा मंडळ, वायंगणी, सायं. ६.०० वा. पालखीचे मंदिरात आगमन, सायं. ७.०० वा.नित्यआरती, रात्रौ ८.०० वा.स्थानिकांची सुस्वर भजने, मंगळवार दि. ०२ डिसेंबर, २०२५ रोजी सकाळी ५.०० वा. राजोपचार पुजा दुग्धाभिषेक व सहस्त्र बिल्वापर्ण पुजन, सकाळी ९.०० वा.सामुदायिक सत्यनारायण महापूजा व होमहवन कार्यक्रम, दुपारी १२.०० वा.आरती, दुपारी १२.३० वा.महाप्रसाद, दु. १.०० वा. पासून स्थानिकांची सुस्वर भजने. बुधवार दि. ०३ डिसेंबर, २०२५ रोजी सकाळी ७.०० वा. नित्य आरती, सकाळी ९.०० वा.श्री सत्यदत्त महापूजा कार्यक्रम, दुपारी १२.०० वा.आरती, दुपारी १२.३० वा.महाप्रसाद, दुपारी ३.०० वा. महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम, दु. १.०० वा. पासून स्थानिकांची भजने, रात्रौ १०.०० वा. नितीन आसयेकर प्रस्तुत श्री देवी भुमिका दशावतार लोककला नाट्यमंडळ मळगाव सावंतवाडी यांचा देवावतारी बाळूमामांच्या जीवनावर आधारित कोकणच्या दशावतार कलेमध्ये पहिल्यांदाच दर्जेदार ट्रिकसीन युक्त दशावतार नाट्यप्रयोग ‘श्री संत सद्गुरु देवावतारी बाळूमामा’ सादर होणार आहे. तरी सर्व स्वामी भक्तांनी उपस्थित राहावे, असे आवाहन श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ, वायंगणी यांच्या वतीने करण्यात आले आहे.











