असलदे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर – पावणादेवीचा हरिनाम सप्ताह

कणकवली (प्रतिनिधी) : असलदे येथील ग्रामदैवत रामेश्वर पावणादेवी अखंड हरिनाम सप्ताह १ डिसेंबर २०२५ रोजी गावठण येथील चव्हाट्यावर होणार आहे. त्यानिमित्त प्रथे परंपरेनुसार धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने असलदे चव्हाटा परिसराला विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

असलदे रामेश्वर पावणादेवी अखंड हरिनाम सप्ताह निमित्त सकाळी १० वाजता घटस्थापना होणार आहे. त्यानंतर गावातील नागरिकांची गा-हाणी, नवस बोलणे, नवस फेडणे , माहेरवासिनींच्या ओट्या भरणे , रात्रौ गावातील वारकरी भजने असे कार्यक्रम होणार आहेत. या हरिनाम सप्ताहानिमित्ताने विविध दुकाने, व्यापारी, विद्युत रोषणाईने परिसर उजळून निघाला आहे.

error: Content is protected !!