नेतर्डे-खोलबागवाडी येथे १८ वर्षीय तरुणीची आत्महत्या; परिसरात हळहळ

सावंतवाडी (प्रतिनिधी) : नेतर्डे-खोलबागवाडी येथे आज सकाळी उघडकीस आलेल्या धक्कादायक घटनेत मयुरी आनंद परब (वय १८) या महाविद्यालयीन तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना रात्रीच्या सुमारास घडली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

सकाळी मयुरी घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आली. ही बाब लक्षात येताच कुटुंबीयांनी तात्काळ स्थानिकांना तसेच पोलीस प्रशासनाला खबर दिली. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे, पोलीस कर्मचारी सिद्धार्थ माळकर, टी. टी. कोळेकर व संगीता बुर्डेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नसून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. मयुरी ही पेडणे (गोवा) येथे बारावी वर्गात शिक्षण घेत होती. तिच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे. तिच्या मागे आई-वडील, भाऊ आणि बहीण असा परिवार आहे.

error: Content is protected !!